महापारेषण कोल्हापूर अंतर्गत वीजतंत्री पदांसाठी शिकाऊ उमेदवारीची संधी; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज | Mahapareshan Kolhapur Trade Apprentice Bharti 2026

MAHATRANSCO Kolhapur Bharti 2026
Latest Updates – Must Apply

Mahapareshan Kolhapur Trade Apprentice Recruitment 2026

Mahapareshan Kolhapur Trade Apprentice Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, आपण देखील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत नोकरी शोधत आहेत तर ही न्युज तुमच्यासाठी, लगेच बघा कुठे आणि किती जागांसाठी निघाली भरती !! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार सन २०२५-२०२६ या वर्षासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. वीजतंत्री (Electrician) या ट्रेडसाठी एकूण ३७ जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे !! अशाच नवीन माहिती साठी रोज mpbharti.com येथे व्हिजिट करा

“और हाँ दोस्तों, इस विषय से जुड़ी सभी नई जानकारी और महत्वपूर्ण खबरें समय पर पाने के लिए इस लिंक से हमारा व्हाट्सएप चैनल और टेलीग्राम चैनल जरूर जॉइन करें। ताकि सभी जरूरी अपडेट्स आपको समय पर मिलते रहें।”

महापारेषण कोल्हापूर भरतीचा तपशील:

  • पद: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / Electrician)
  • एकूण जागा: ३७
  • प्रशिक्षण कालावधी: १ वर्ष
  • वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट)
  • अधिकृत वेबसाईट : mahatransco.in

महापारेषण कोल्हापूर भरती शैक्षणिक पात्रता:

उमेदवार १० वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) वीजतंत्री (Electrician) ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

१) शैक्षणिक अर्हताः- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) या आस्थापनेचा यापुर्वीचा रजिस्ट्रेशन कमांक E05202702164 काही तांत्रिक अडचणीमुळे कायमस्वरूपी बंद केला असून, सदर आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकवर उमेदवारांनी सादर केलेले अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
३) विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल.
४) पदसंख्या कमी किंवा जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले व सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळविणे व्यवस्थापनास बंधनकारक राहणार नाही.
५) कोल्हापूर जिल्हयातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य देणेत येईल.
६) ऑनलाईन अर्ज सादर करताना एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करून माहीती भरावी.
७) एस.एस.सी गुणपत्र/प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र / प्रमाणपत्र साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच, आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये जात प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच या कार्यालयाने मागणी केल्यास शासकीय नियमाप्रमाणे आरक्षणा संबंधित कागदपत्रे सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील. अन्यथा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

MAHATRANSCO Kolhapur Bharti 2026

महापारेषण कोल्हापूर भरती अर्ज करण्याची पद्धत आणि महत्त्वाची तारीख:

इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या apprenticeshipindia.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना महापारेषण कोल्हापूरचा आस्थापना नोंदणी क्रमांक E04262700196 वापरणे गरजेचे आहे.

  • अर्ज करण्यास सुरुवात: ५ मे २०२६
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: २५ मे २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)

महापारेषण कोल्हापूर भरती वयोमर्यादा

वयोमर्यादा १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ शिथिलक्षम)

MAHATRANSCO Kolhapur Bharti 2026 –  Overview

CategoryDetails
OrganizationMaharashtra State Electricity Transmission Company Ltd. (MAHATRANSCO)
LocationKolhapur Division
TradeElectrician (Apprenticeship)
Total Vacancies37
Educational QualificationSSC (10th) Pass + ITI in Electrician Trade (NCTVT)
Age Limit18 to 30 years (5 years relaxation for reserved categories)
Establishment Registration No.E04262700196
Application Start DateMay 5, 2026
Application Last DateMay 25, 2026
Application Portalapprenticeshipindia.gov.in
PreferenceFirst preference to candidates from Kolhapur district

काही महत्त्वाच्या अटी:

१. कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना निवडीमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाईल.
२. अर्जदाराने पोर्टलवर फोटो आणि मूळ कागदपत्रे स्पष्टपणे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
३. उमेदवाराचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय असणे बंधनकारक आहे, जेणेकरून पुढील संपर्क साधता येईल.
४. जुना नोंदणी क्रमांक (E05202702164) तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला असल्याने, नवीन नोंदणी क्रमांकावरच अर्ज सादर करावेत.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि शासनाच्या आरक्षणाच्या नियमांनुसार केली जाईल. यशस्वी उमेदवारांना नियमानुसार विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात किंवा महापारेषणच्या mahatransco.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

ऑनलाईन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सदयस्थितीत कार्यान्वित असणारा Email-ID व भ्रमनध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. Email-ID व भ्रमनध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य नाही झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
शिकाऊ उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
निवड केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी रूजू होताना जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर यांच्याकडुन वैदयकीय दृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला देणे बंधनकारक आहे.
कागदपत्रे तपासणी किंवा शिकाऊ उमेदवार म्हणुन हजर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता मिळणार नाही.
शिकाऊ उमेदवारीच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये कंपनीकडुन कोणतीही निवासव्यवस्थेची मागणी करता येणार नाही.

Download Mahapareshan Kolhapur Bharti PDF

Table of Contents

Leave a Comment

WA TG